ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

महापालिकेचे मुख्य लेखापाल लाच कोणासाठी मागतात – रमेश वाघेरे

पिंपरी, दि. २८ - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे हे बिलांचे पैसे अदा करण्याच्या बदल्यात ठेकेदारांकडून टक्के रक्कम कोणासाठी मागत आहेत?, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी उपस्थित केला आहेत. तसेच याप्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषी आढळणा-यांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी पालिकेकडे केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात वाघेरे यांनी म्हटले आहे की, मुख्य लेखापाल लांडे हे बीलांचे पैसे अदा करण्याच्या बदल्यात टक्के मागत असल्याच्या तक्रारी ठेकेदारांनी थेट पंतप्रधानांच्या संकेतस्थळावर केल्या आहेत. लांडे हे ठेकेदारांकडून टक्के नेमके कोणासाठी मागत आहेत.

स्थायी समितीने तब्बल १६० कोटी रुपयांची ठेकेदारांची बिले अडविली आहेत. त्यामुळे मुख्य लेखापाल लांडे हे बिलांचे पैसे देण्यासाठी टक्के नेमके कोणासाठी मागत आहेत. याबाबत संशय निर्माण झाला आहे. लांडे यांनी टक्के स्थायी समितीच्या सांगण्यावरुन मागितले आहेत का? याची सखोल चौकशी करण्याची मागणी वाघेरे यांनी केली आहे. तसेच यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची, मागणीही त्यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.