ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भीमसृष्टीच्या कामाला गती द्या, महापौरांच्या अधिका-यांना सूचना

पिंपरी, दि. २९ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी चौक येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आबेडकर पुतळा उद्यानामध्ये उभारण्यात येणा-या भीमसृष्टीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना, महापौर नितीन काळजे यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.

पिंपरी येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आबेडकर पुतळा उद्यानामध्ये उभारण्यात येणा-या भीमसृष्टीच्या नियोजनाबाबत महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.२८) बैठक झाली. त्यावेळी भीमसृष्टीचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत.

स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या या बैठकीस आमदार गौतम चाबुकस्वार, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सभागृह नेते एकनाथ पवार, अतिरिक्त आयुक्त अच्युत हंगे ,नगरसेवक राहुल भोसले, समीर मासुळकर, अंबरनाथ कांबळे, बाळासाहेब ओव्हाळ, नगरसेविका सुलक्षणा शीलवंत, गीता मंचरकर, शहर अभियंता अंबादास चव्हाण, कार्यकारी अभियंता संजय घुबे, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर खिलारे, उपअभियांता व्ही.के.वायकर, कनिष्ट अभियंता दीपक गरुड, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता शरद जाधव, शिल्पकार डॉ.जी.एन.आंबे, महेंद्र थोपटे, वास्तुविशारद गिरीश चीददरवार, ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर, माहिती जनसंपर्काचे किशोर केदारी आदी उपस्थित होते.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन प्रसंगास अनुसरून काळानुरूप म्युरल्स तयार करणे त्याबाबत मुख्य पुतळ्याजवळ सिमा भिंतीलगत म्युरल्स बसविणे याबाबत वास्तुविशारद गिरीश चीददरवार यांनी संपूर्ण भीमसृष्टी उभारणे या प्रकल्पाबाबत चित्रफितीद्वारे सादरीकरण करून उपस्थितीतांना सविस्तर माहिती दिली. उभारण्यात येणा-या भीमसृष्टीमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या संपूर्ण कार्याबाबतचे म्युरल्स बसविण्यात यावे. कामास गती देऊन काम लवकरात लवकर पूर्ण करावे. याकामी लागणारी सर्व प्रकारची मदत मनपाच्या वतीने करण्यात येईल, असे महापौर नितीन काळजे यांनी यावेळी सांगितले.

भीमसृष्टी उभारणे या प्रकल्पाचे कामकाज २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत पूर्ण करावे अशा सूचना आमदार गौतम चाबुकस्वार यांनी संबंधितांना दिल्या. भीमसृष्टीमध्ये १९ म्युरल्स बसविण्यात येणार