ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर कंटेनर बाहेर, वाहतूक पूर्ववत

पिंपरी, दि. ४ - पिंपरी ग्रेड सेपरेटरमध्ये आज (मंगऴवारी) पहाटे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा एक कंटेनर अडकल्यामुळे या मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. वाहतूक पोलिसांच्या तीन तासाच्या कसरतीनंतर कंटेनर बाहेर काढण्यात आला.

अगरवाल मूव्हर्स ग्रुपचा हा कंटेनर होता. वाहतुकीचे नियम व सूचनांकडे दुर्लक्ष करत नेहमीच जड व उंड वाहने पिंपरी ग्रेड सेपरेटमध्ये अडकत असतात. आज पहाटे असाच एक कंटेनर पिंपरी ग्रेडसेपटरमध्ये अडकला. यावेळी पिंपरी वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहायाने खराळवाडी पर्यंत पाठीमागे घेत त्याला बाहेर काढले. ही सारी कसरत तब्बल अडीच ते तीन तास चालू होती. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली आहे.

यापुर्वी देखील २१ जून रोजी हैद्राबादकडून मुंबईकडे जाणा-या या बोअरवेलच्या गाड्या नाशिकफाटा येथून ग्रेड सेपरेटमध्ये घुसल्या. त्या खराळवाडीपर्यंत अडथळ्याशिवाय आल्या मात्र पिंपरीच्या चौकात येताच त्यांना गाड्या पुढे जाणार नाहीत याचा अंदाज आला त्या तेथेच थांबल्या. त्यामुळे त्यांच्या मागे इतर गाड्यांची रांग लागली. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी गाड्यांना मागे घेत खराळवाडी येथून त्यांना पुन्हा सेवारस्त्यावर आणले होते.

ग्रेडसेप्रेटर मधून केवळ साडेचार मीटर उंचीच्या गाड्या जाऊ शकतात मात्र या नियमाकडे दुर्लक्ष करत जड वाहने नेहमीच ग्रेडसेपरेटचा वापर करताना दिसतात. या आधीही कंटेनर, क्रेन अशा गाड्या ग्रेडसेपरेटरमध्ये अडकल्याच्या घटना घडल्या आहेत. यासाठी वाहतूक प्रशासन व वाहन चालकांनीही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.