ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

तीन महिन्यात ७७ हजार जणांनी भरला मालमत्ताकर ऑनलाईन

पिंपरी, दि. ४ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सात वर्षापूर्वी सुरु करण्यात आलेल्या 'ऑनलाईन' मालमत्ताकत भरणा सुविधेला आता वेग आला आहे. घरबसल्या एका क्लिकवर कर भरणा-यांच्या संख्येत दरवर्षी दुपटीने वाढ होत आहे. चालू आर्थिक वर्षात अवघ्या तीन महिन्यात तब्बल ७७ हजार १८२ नागरिकांनी ऑनलाईन कर भरणा केला अशी माहिती सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे २० लाखांवर पोहोचली आहे. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय नेहरु पुनरुत्थान अभियानांतर्गंत (जेएनएनयुआरएम) शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली आहेत. सुसज्ज रस्ते, उड्डाणपूल शहराची ओळख बनली आहे. येथील पायाभूत सोयी-सुविधा, महापालिकेने उभारलेल्या वैविध्यपूर्ण प्रकल्पांमुळे हा परिसर मालमत्ताधारकांच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला आहे. त्यामुळे दरवर्षाला शेकडो मालमत्तांची भर पडत आहे. पर्यायाने महापालिकेचा मालमत्ताकर भरणा वाढला आहे.

नागरिकांना करभरणा सहज करता यावा यासाठी महापालिकेची शहरात १५ करआकारणी व करसंकलन विभागिय कार्यालये आहेत. आगाऊ कर भरणा करणा-या मालमत्ताधारकांना महापालिका करामध्ये दहा टक्के सवलत देते. त्यामुळे आगाऊ कर भरणा करण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. याशिवाय महापालिकेने सन २००९-१० मध्ये 'ऑनलाईन' कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली. त्यानंतर प्रत्येक वर्षी ऑनलाईन कर भरणा-यांच्या संख्येत दुपटीने वाढ होत आहे. २०१०-११ मध्ये 'ऑनलाईन' कर भरणा सुविधेव्दारे सुमारे २४ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते. त्यावेळी २५ हजार ६६७ नागरिकांनी 'ऑनलाईन' कराचा भरणा केला होता. मात्र, गेल्या सात वर्षात ऑनलाईन मालमत्ताकर भरणा-यांची संख्या प्रचंड वाढली आहे.

महापालिकेच्या मालमत्ताकर विभागाने चालु आर्थिक वर्षात १ एप्रिल २०१७ ते ३० जून २०१७ या तीन महिन्यात 'ऑनलाईन'द्वारे ८२ कोटी ३५ लाख रुपये मालमत्ताकराची वसुली केली आहे. त्यामध्ये ७७ हजार १८२ करदात्यांनी ऑनलाईन कराचा भरणा केला. घरबसल्या एका क्लिकवर कर भरण्याकडे नागरिकांचा कल वाढत असून यामध्ये आयटी नोकरदारांची संख्या लक्षणीय आहे.

त्याचबरोबर रोख अथवा डीडीद्वारे ६७ हजार ४०६ मालमत्ताधारकांनी ३७ कोटी ९२ लाख रुपये कर भरणा केला आहे. तर, धनादेशाद्वारे २४ हजार ६६४ जणांनी ६७ कोटी १९ लाख रुपये कर भरणा केला आहे. असा १ लाख ६९ हजार २५२ करदात्यांकडून १८७ कोटी ४५ लाख रुपयांचा महसूल महापालिका तिजोरीत जमा झाला आहे, असे दिलीप गावडे यांनी सांगितले.