ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

सहाय्यक आयुक्त विजय खोराटे यांच्याकडे भूमी आणि जिंदगी विभाग

पिंपरी, दि. ५ - पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीवर सहाय्यक आयुक्त या पदावर नियुक्त झालेले विजय खोराटे यांच्याकडे भूमी आणि जिंदगी विभाग, सार्वजिनक वाचनालये, प्रेक्षागृहाचा कार्यभार देण्यात आला आहे. तसेच आरोग्य अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभारही देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीवर असलेले सहाय्यक आयुक्त चंद्रकांत खोसे यांची जळगाव पालिकेत उपायुक्त म्हणून बदली झाली. त्यांच्या जागी विजय खोराटे यांची नियुक्ती झाली होती. खोराटे यांनी सोमवारी (दि.) सहाय्यक आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन ते रुजू झाले आहेत.

खोराटे यांच्याकडे भूमी आणि जिंदगी विभाग, सार्वजिनक वाचनालये, प्रेक्षागृहचा कार्यभार देण्यात आला आहे. तसेच आरोग्य अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभारही देण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांच्या आस्थापनाविषयक बाबी या भूमी आणि जिंदगी विभागामध्ये राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.