ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

राजेंद्र जगताप यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

पिंपरी, दि. ६ - राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी आज भाजपाला राम राम केला आहे. आज चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात  अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला. राजेंद्र जगताप हे भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचे ते चुलत बंधू आहेत. त्यामुळे या घटनेला महत्त्व आले असून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे.

नुकत्याच झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत नवनाथ जगताप यांच्या विरोधात त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. पुन्हा राष्ट्रवादीच्या प्रवेशामागील कारण अद्याप समजू शकले नाही. तथापि निवडणुकीत आमदारांनी राजेंद्र जगताप यांचा प्रचार केला नसल्यामुळे त्यांचा पराभव झाला. या नाराजीमधूनच जगताप यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.