ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पराभवाची जबाबदारी माझीच, पराभव झाल्याची खंत - अजित पवार

पिंपरी, दि. ७ - पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना मोठ्या प्रमाणात विकास कामे केली. परंतु, फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला. या पराभवाची जबाबदारी माझीच आहे. याला मी कोणाला जबाबदार नाही. मात्र विकासकामे करूनही पराभव झाल्याची खंत वाटत आहे, अशी भावना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. पराभवाने खचून जाता कार्यकर्त्यांनी पुन्हा जोमाने कार्यक्रमाला लागावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज (गुरुवारी) चिंचवडमध्ये मेळावा झाला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवती अध्यक्षा स्मिता पाटील आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादीने शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजने (जेएनयूआरएम) अंतर्गत गृहप्रकल्प राबविला. कमी पैशात गोरगरिबांना घरे उपलब्ध करून दिली. मात्र, आता सत्तेत असणारे न्यायालयात गेले. त्यामुळे काही लोक आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहिले आहेत, असे सांगत अजित पवार पुढे म्हणाले, भाजप आता शहरात प्रधानमंत्री आवाज योजना राबविणार आहे. या योजनेअंतर्गत केवळ ३०० स्क्वेअर फूटाचे घर देऊन गोरगरिबांकडून लाख ७७ हजार  रुपये घेणार आहेत. पैसे जास्त घेणार आणि घर कमी स्क्वेअर फुटाचे देणार आहेत.

राज्यात राष्ट्रवादीची सत्ता असतानाही रावेत, वाल्हेकरवाडी येथील रिंग रोडचा प्रश्न होता. परंतु, लोकांच्या घरावर बुल्डोझर फिरवून आम्हाला विकास करायचा नाही. रिंग रोडवरील घरे पाडण्यास राष्ट्रवादीचा तीव्र विरोध आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट घेऊन रिंग रोड बाधित लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

पावसाळ्यात घरे पाडण्यात येऊ नये असा नियम आहे. परंतु, प्राधिकरणाने नियमाला तिलांजली देऊन पावसाळ्यातच घरांना नोटीस दिल्या असून हे चुकीचे आहे, असेही पवार म्हणाले.