ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

खराळवाडी येथील ओव्हर ब्रीज न तोडण्याची मागणी

पिंपरी, दि. ८ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मुंबई-पुणे महामार्गावर खराळवाडी येथे नागरिकांच्या सोयीसाठी बनविण्यात आलेला 'ओव्हर ब्रीज' मेट्रोच्या कामासाठी तोडू नये, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका गीता मंचरकर यांनी पालिकेकडे केली आहे. तसेच 'ओव्हर ब्रीज' काढण्याअगोदर नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशीही मागणी त्यांनी केली.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी कॅम्प, नेहरुनगर, खराळवाडी आणि मुंबई-पुणे महामार्गावरुन येणा-या नागरिकांसाठी पालिकेतर्फे खराळवाडी येथे 'ओव्हर ब्रीज' बनविण्यात आला आहे. परंतु, शहराच्या विकासासाठी मेट्रोचे प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे.

त्यासाठी खराळवाडी येथील 'ओव्हर ब्रीज' तोडण्याचा प्रस्ताव येऊ शकतो. मेट्रो प्रकल्पाला आपला कसलाच विरोध नाही. शहराचा विकास व्हावा, नावलौकिक मिळावे, हीच आमची भूमिका आहे. परंतु, विकास कामे होत असताना नागरिकांची गैरसोय होवू नये. तसेच शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पिंपरी, नेहरुनगर, खराळवाडी परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची पालिकेने दक्षता घेणे गरजेचे आहे.