ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सत्ताधाऱ्यांना करावा लागला रिंगरोडबाधितांच्या रोषाचा सामना

पिंपरी, दि. १०रिंगरोड प्रकल्पासाठी आमची घरे पाडू नका, असे म्हणत आंदोलनकर्त्यांनी मदतीसाठी आलेल्या आमदार लक्ष्मण जगताप महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार स्थानिक नगरसेवकांवरच रोष व्यक्त केला. तो गोंधळ पाहून लोकप्रतिनिधींना मात्र काढता पाय घ्यावा लागला. तर आमची केवळ त्यांना मदत करण्याची भूमिका होती, अशी प्रतिक्रिया सत्तारुढ पक्षनेते पवार यांनी दिली आहे.
रिंगरोड प्रकल्पामध्ये घरे जाणाऱ्या बाधितांनी घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने विविध प्रकारे आंदोलन सुरु केले आहे. त्याचाच भाग म्हणून नागरिकांनी हक्काचे घर वाचविण्यसाठी आज (रविवारी) दुपारी वाजता  चिंचवड येथील दगडोबा चौक येथील संकल्पसिद्धी गार्डन शेजारी या पोस्टकार्ड पाठवा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. पोस्टकार्ड पाठवा आंदोलन केले. यावेळी या आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक सचिन चिंचवडे नामदेव ढाके आले होते. यावेळी पवार म्हणाले की, या प्रकल्पात घरे जाणार नाहीत याची काळजी घेतली जाईल तसेच ज्यांची घरे जातील त्यांचे आम्ही पुनर्वसन करू.

मात्र आमची हक्काची घरे आम्ही का सोडायची, आम्हाला पुनर्वसन नको, असे म्हणत आंदोलनकर्ते आक्रमक झाले. यावेळी परिस्थिती पाहता उपस्थित लोकप्रतिनिधींना काढता पाय घ्यावा लागला.

आमची मदत करण्याचीच भूमिका - एकनाथ पवार

याविषयी बोलताना एकनाथ पवार म्हणाले की, आमची आंदोलनकर्त्यांना पूर्णपणे मदत करण्याची भूमीका होती. मात्र त्या ठिकाणी आंदोलकाबरोबर काही भाजपाविरोधी लोकही होते. त्यांनी विनाकारण हा प्रश्न चिघळवला. चर्चेतून मध्यममार्ग निघाला असता, मात्र या विषयाला राजकीय वळण दिले जात आहे. विनाकारण वाद उपस्थित केला जात आहे. अनधिकृत बांधकामे प्राधिकरणातील घरांच्या प्रश्नांसदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी यापूर्वीही आमदारकीचा राजीनामाही दिला होता. आजही आम्ही चर्चेसाठीच गेलो होतो, मात्र आंदोलने Posted On: 10 July 2017