ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मध्यवर्ती केंद्र स्थापन्यास टाळाटाळ, पालिका आयुक्तांना नोटीस

पिंपरी, दि. १० - पिंपरी-चिंचवड महापालिकेत माहिती अधिकाराखालील अर्ज स्वीकारण्यासाठी मध्यवर्ती केंद्राची स्थापना करण्यात टाळाटाळ केली जात आहे. मागणी करुनही टाळाटाळ केली जात असल्याने महापालिकेला नोटीस बजावण्यात आली आहे.

फुगेवाडी येथील वकील सतीश कांबिये यांनी दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम ८० नुसार ३० जून रोजी ही नोटीस दिली आहे. कांबिये यांनी जुलै २०१५ रोजी महापालिका आयुक्तांकडे अर्ज करून महापालिका मुख्यालयात माहिती अधिकाराखालील अर्ज स्वीकारण्यासाठी मध्यवर्ती केंद्राची स्थापना करावी अशी विनंती केली होती. मात्र, त्यावर महापालिकेने कोणतीही कार्यवाही केल्याने त्यांनी महापालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे.

केंद्र सरकारच्या कार्य, लोकतक्रार आणि पेन्शन विभाग (कार्य प्रशिक्षण विभाग) यांनी १९ मे २०११ रोजी सर्व संबंधित विभागांना आणि केंद्रीय माहिती आयोगाला एका कार्यालयीन ज्ञापनाद्वारे ज्या शासकीय कार्यालयात एकापेक्षा अधिक माहिती अधिकारी असतील त्यांनी माहिती अधिकारातील अर्ज आणि अपिले स्वीकारण्यासाठी मध्यवर्ती केंद्राची स्थापना करावी अशी सूचना केली होती. या सूचनेनुसार महापालिका मुख्यालयात मध्यवर्ती माहिती केंद्राची स्थापना व्हावी अशी मागणी २०१५ पासून कांबिये करत आहेत.

महापालिका आयुक्तांना दिलेल्या नोटीसीत कांबिये यांनी असे म्हटले आहे की, महापालिका मुख्यालयात मध्यवर्ती माहिती केंद्र स्थापन करण्यात यावे अशी मागणी करणारा अर्ज केंद्र सरकारच्या कार्य, लोकतक्रार आणि पेन्शन विभागाचे कार्यालयीन ज्ञापन जोडून ४ जुलै २०१५ रोजी महापालिका आयुक्त कार्यालयात करण्यात आला होता. असा कक्ष स्थापन करण्यामागे काही कारणे असतील तर त्याचा खुलासा व्हावा असेही या अर्जात नमूद करण्यात आले होते. या अर्जाबाबत आपणाकडून काहीही कळविण्यात आले नाही.

वरील पत्रास उत्तर दिल्यामुळे अथवा मध्यवर्ती माहिती कक्ष स्थापन केल्यामुळे कांबिये यांनी ही नोटीस दिली असून अर्जास उत्तर देणे अथवा मध्यवर्ती कक्ष स्थापन करण्याची कारणे कळविणे हे महापालिका आयुक्तांचे बेजबाबदार वर्तन असून नोटीस Posted On: 10 July 2017