ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पिंपरी-चिंचवडमध्ये एसी बस धावली

पिंपरी, दि. १० - पीएमपीएमएलच्या वतीने निगडी ते कात्रज या मार्गासह अन्य चार मार्गावर वातानुकूलित बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन सभागृह नेते एकनाथ पवार यांच्या हस्ते शनिवारी (दि.८) करण्यात आले.

यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, महिला बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, नगरसेवक उत्तम केंदळे, शीतल शिंदे, कुंदन गायकवाड, नगरसेविका माधुरी कुलकर्णी, उषा मुंढे, भाजपचे प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, शहर सरचिटणीस सारंग कामतेकर, अनुप मोरे, सुरशे वाडकर आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या पीएमपीएमएलच्या या वातानुकूलित बसचे दर कमी आहेत. सामान्य माणसालाही परवडतील असे दर आहेत. त्यामुळे हा उपक्रम अत्यंत चांगल्या प्रकारे चालेल, असा विश्वास स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी व्यक्त केला.

पीएमपीएलने प्रायोगित तत्वावर पाच वातानुकूलित बस सुरु केल्या आहेत. त्यापैकी पुण्यात तर पिंपरी-चिंचवडमध्ये धावणार आहेत. या बसचे  तिकीट दर कमीत-कमी २० रुपये आणि जास्तीत-जास्त ६० रुपये असणार आहे. या वातानुकूलित बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास आणखी बस वाढविण्यात येणार आहेत, असे पीएमपीएल प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.