ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बीआरटीएस मार्गावर सप्टेंबर अखेर बस धावणार - आयुक्त हर्डीकर

पिंपरी, दि. ११ - पुणे-मुंबई बीआरटीएस मार्गावर सप्टेंबर अखेरपर्यंत बससेवा सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. बस थांबे, सिग्नल यंत्रणा, सेफ्टी ऑडीटचे नियोजन सुरु आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी (दि.१०) पत्रकारांशी बोलताना दिली.

नागरिकांना विनाअडथळा जलद प्रवास करता यावा, प्रदूषणमुक्तीसाठी सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा, यासाठी बस रॅपिड ट्रान्झीट सिस्टमअर्थात बीआरटीएस मार्ग उभारण्यात आले आहेत. औंध- रावेत या मार्गावर बीआरटीएस बससेवा सुरू आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून पुणे-मुंबई मार्गावरील निगडी ते दापोडी या साडेबारा किलोमीटर लांबीच्या मार्गावर बीआरटीएस सेवा सुरू करण्याचा प्रकल्प रेंगाळला आहे.

याबाबत आयुक्त हर्डीकर यांना विचारले असता ते म्हणाले, निगडी ते दापोडी या बीआरटीएस मार्गावर १४ ठिकाणी बसथांबे उभारण्याची निविदा प्रक्रिया पुर्ण झाली आहे. वाहनतळाची सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने पाऊली उचलली जात असून त्याबाबतच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. सिग्नल यंत्रणा कार्यन्वित करण्याचे काम सुरु आहे.

या मार्गावर पीएमपीएलच्या वाढीव बस आणण्याचे नियोजन सुरु आहे. या सगळ्या कामाचा आपण आढावा घेत असून सप्टेंबर अखेर बीएआरटीएस मार्गावर बस धावतील, असा आशावाद आयुक्त हर्डीकर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, दिलीप बंड आयुक्त असताना २००६ मध्ये बीआरटीएस प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला होता. त्यानंतर जेएनएनयुआरएमअंतर्गत शहरात बीआरटीएस प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली. परंतु, अनेक प्रकल्प रेंगाळले आहेत. मुंबई-पुणे मार्गावरील बीआरटीएस प्रकल्प तर अनेक वर्षांपासून रखडला आहे.

बंड यांच्यानंतर आयुक्त म्हणून आशिष शर्मा, डॉ. श्रीकर परदेशी, राजीव जाधव आणि दिनेश वाघमारे असे चार आयुक्त आले. प्रत्येक आयुक्तांनी बीआरटीएस प्रकल्प लवकर सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते पुर्ण झाले नाही. आता हर्डीकर यांनी पुणे-मुंबई मार्गावर सप्टेंबर अखेर बस धावणार असल्याचे सांगितले आहे.