ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

बलात्काराचा कांगावा, 'क्राईम पेट्रोल'फेम अभिनेत्रीला अटक

पिंपरी, दि. ११ - क्राईम पेट्रोल मध्ये पोलिसाची भूमिका करणारी अभिनेत्री प्रत्यक्षात स्वतःवर अत्याचार झाल्याची तक्रार दाखल करायला आली. मात्र तिलाच पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पूजा जाधवच्या भोळ्याभाबड्या चेहऱ्यावर जाऊ नका. कारण यामागे एक कारस्थानी मेंदू आहे. पिंपरी पोलिसांनी तिचा पर्दाफाश केला आहे.

पूजा जाधवनं काही दिवसांपूर्वी एका धनदांडग्याला आपल्या जाळ्यात ओढलं, त्याच्याशी लगट केली आणि त्यानंतर बलात्काराच्या आरोपाची धमकी देऊन पैसे उकळायला सुरुवात केली. संबंधित व्यक्तीनं पोलिस ठाणे गाठलं आणि पूजाचं बिंग फुटलं. पूजा जाधवला यासाठी माया सावंत, रवींद्र सिरसाम आणि अन्य दोन महिलांचीही साथ असायची. ते दोघे सामाजिक कार्यकर्ते असल्याचं भासवायचे आणि धमक्या द्यायचे.

पूजानं हेरलेलं हे काही पहिलं सावज नाही. त्यामुळे याआधीच्या गुन्ह्यांचाही तपास पोलिसांनी सुरु केला. बडे ठेकेदार, बांधकाम व्यावसायिक, हॉटेल मालक आणि इंजिनियर्स अशी पूजाची हिटलिस्ट होती. त्यामुळे पूजानं तुम्हालाही गंडवलं असेल, तर तातडीनं पिंपरी पोलिसांना गाठून तक्रार द्या.