ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही

पिंपरी, दि. १२ - केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या व्दितीय वर्षपूर्ती निमित्त पुणे महापालिकेने स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या अंतर्गत काही प्रकल्पाचा उद्धघाटन कार्यक्रम २५ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठेवण्यात आला होता. वेळे अभावी तो पुढे ढकलून जुलैला करण्याचे निश्चित करण्यात आले त्यानंतर तो अचानक जुलै रोजी रद्द करण्यात आला. अद्याप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेस कोणतीही वेळ दिलेली नाही.

स्मार्ट सिटी योजने अंतर्गत पुणे महापालिकेने स्वयंरोजगार केंद्रांचा लाईट हाऊस प्रकल्प सुरू केला आहे. या अंतर्गत हडपसर येथे उभारण्यात आलेल्या लाईट हाऊस प्रकल्पाचे उद्घाटन आज महापौर मुक्ता टिळक आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या हस्ते केले जाणार आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकल्पा बरोबरच हडपसर येथे उभारल्या जाणाऱ्या ७५० टन क्षमतेच्या कचरा प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

मात्र, आता मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने महापौरच हे उद्घाटन करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात गवगवा करण्यात आलेल्या स्मार्ट सिटीचा एकही प्रकल्प अद्याप शहरात व्यवस्थितरित्या सुरु झालेला नाही त्यामुळे या उदघाटन कार्यक्रमाकडे मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे.