ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुणे मेट्रो अगोदर पिंपरी-चिंचवडमध्ये धावणार - डॉ. ब्रिजेश दीक्षित

पिंपरी, दि. १२ - पुणे मेट्रोचे काम पिंपरी-चिंचवडमध्ये वेगात सुरू आहे. मेट्रोसाठी आवश्यक जागा ताब्यात घेण्यात आली आहे. मेट्रोचा पहिला 'पिलर' वल्लभनगर येथे झाला असून पुणे मेट्रो सर्वात अगोदर पिंपरी-चिंचवडमध्ये धावणार आहे, अशी माहिती महामेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी आज (बुधवारी) पिंपरीत दिली.

पिंपरी-चिंचवड परिसरात होत असलेल्या मेट्रो प्रकल्पाविषयी माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. यावेळी महामेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक रामनाथ सुब्रमण्यम आदी उपस्थित होते.

पुणे मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये -या अर्थाने मेट्रोच्या कामाने वेग घेतला आहे. मेट्रो पहिल्या फेजमध्ये पिंपरीपर्यंत धावणार आहे. पिंपरीपर्यंत मेट्रोची सहा स्टेशन असणार आहेत. दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, नाशिक फाटा, संत तुकारामनगर आणि पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर मेट्रोची स्थानके असणार आहेत, असे सांगत डॉ. दीक्षित पुढे म्हणाले, मेट्रो लोकाभिमुख करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात होत असलेली मेट्रो ही जागतिक दर्जाची करण्याबरोबरच नागरिकांसाठी सुसह्य, पर्यावरणपूरक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एका झाडामागे १० झाडे लावण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. आकुर्डीत मेट्रो -को पार्क सुरू असून तिथे ८०० झाडे लावण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मेट्रोच्या कामाला पिंपरी महापालिकेचे सहकार्य मिळत आहे. फुगेवाडीत मेट्रोच्या कार्यालयासाठी पालिकेने जागा दिली असून लवकरच कार्यालय कार्यान्वित होईल. तसेच माहिती केंद्र देखील सुरू करण्यात येणार आहे. यासाठी संत तुकारामनर येथे जागा उपलब्ध होणार आहे. तसेच संवादासाठी मेट्रो मित्र बनविणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यातच मेट्रो निगडीपर्यंत करण्याबाबत विचारले असता डॉ. दीक्षित म्हणाले की, निगडीपर्यंत मेट्रो नेण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. परंतु, कोणत्याही प्रकल्पाचे काम अगोदर सुरू होणे गरजेचे असते. दिल्लीमध्ये पहिल्या टप्यात ६५ किलोमीटरच मेट्रोचे काम झाले होते. आता Posted On: 12 July 2017