ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शास्तीकराऐवजी मूळ मिळकतकर भरण्याची सुविधा, स्थायीमध्ये ठराव

पिंपरी, दि. १३ - पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांकडून शास्तीकराऐवजी मूळ मिळकतकर भरून घेण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव बुधवारी (दि.१२) रोजी झालेल्या स्थायी समितीमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनामार्फत शास्तीकर भरण्यासाठी नागरिकांना वेठीस धरले जात असल्याने स्थायी समिती सभेत सदस्यांनी संताप व्यक्त केला. मिळकतकर भरण्यासाठी येणा-या नागरिकांकडून आधी शास्तीकर वसूल केला जात असल्याचे नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले.

शहरात २००८ नंतर विनापरवाना बांधण्यात आलेल्या बांधकामांना अनधिकृत बांधकाम ठरविण्यात आले आहे. या बांधकामांना मूळ मिळकतकराच्या तिप्पट शास्तीकर कर लावण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत २००८ नंतर ६६ हजारांहून अधिक अनधिकृत बांधकामे आहेत. त्यामध्ये नवीन आणि वाढीव बांधकामांचाही समावेश आहे. हे बांधकामधारक मिळकतकर भरण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात गेल्यास त्यांच्याकडून आधी शास्तीकर वसूल केला जात आहे. शास्तीकर भरल्यास मिळकतकर घेतला जात नाही.

हा मुद्दा स्थायी समितीत नगरसेवकांनी उपस्थित केला. मूळ मिळकतकर भरून घेतल्यास महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची भीती नगरसेवकांनी व्यक्त केली. प्रशासनाने नागरिकांची अडवणूक करुन नये, अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली. हर्षल ढोरे यांनी नागरिकांकडून शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर घेण्याचा ठराव मांडला. त्याला एकमताने स्थायी समितीने मंजुरी दिली.