ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

विविध उपक्रमांनी विरोधी पक्षनेते योगेश बहल यांचे वाढदिवस साजरा

पिंपरी, दि. १४ पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते व नगरसेवक योगेश बहल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. महाराष्ट्राचे कर्तबगार लोकनेता असलेल्या अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या अनेक धुरंधर नेत्यांपैकी योगेश बहल एक आहेत.

गेल्या २० वर्षांपासून शहरातील रा़जकारणाचा केंद्रबिंदु म्हणून बहल यांच्याकडे पाहिले जाते. समाजातील सर्व स्तरातील तसेच सर्व जाती धर्मातील लोकांशी मराठी मनाशी बहल यांची नाळ कायम जोडली गेली आहे. महापालिका प्रशासन सभागृहातील अभ्यासू राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे कोणीही त्यांच्याकडे कोणी एखादे काम घेउन जावे आणि ते होणार नाही असे कधीही झाले नाही.

शहरातील अनेक विकासाच्या वाटा निर्माण करण्यात योगेशजी बहल यांचे खूप मोठे योगदान आहे, हे कुणीही नाकारु शकत नाही. जनतेचे प्रश्न मार्गी लावणारे नेते, धडाडीने आणि तातडीने निर्णय घेण्याची त्यांची दृष्टी, एकुणच त्यांच्या कार्यपद्धतीचा रुबाब, आवाजातील जरब आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अत्यंत अभ्यासपुर्ण काम करणारा नेता ही योगेश बहल यांची वैशिष्ट्ये आहेत. महापौरपदाच्या कालावधीत शहरातील सर्वसामान्य लोकांसाठी अनेक हितकारक उपक्रम त्यांनी राबविले आहेत.

महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात नवनिर्मीतीची, विकासाची प्रक्रीया राबविताना पिंपरी चिंचवड हे शहर रोल मॉडेल केले आहे. पिंपरी चिंचवड विकासाचे श्रेय नक्कीच योगेश बहल, त्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहणारे अजितदादा पवार, तसेच बहल यांचे सहकारी, कार्यकर्ते या सगळ्यांना जाते. पिंपरी चिंचवड शहराला कौतुकाच्या मानबिंदुवर नेउन ठेवणारे योगेश बहल साहेबांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.