ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आयुक्तांनी महिन्यातून एकदा जनता दरबार घेतला पाहिजे - महापौर

पिंपरी, दि. १५ - पिंपरी–चिंचवडमधील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी महापौर महापालिका आयुक्तांनी महिन्यातून एखदा जनता दरबार घेण्याची मागणी निगडीतील डॉ. बी. आर. आंबेडकर ग्रुपने पालिकेकडे केली आहे. दरम्यान, जनता दरबार घेण्याची मागणी योग्य आहे. याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाला देणार आहे, असे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.

याबाबत ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी महापौर नितीन काळजे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, नागरिकांच्या समस्या जागेवर सुटल्या पाहिजेत. जनता दरबाराच्या माध्यमातून महापौर आणि आयुक्तांना समस्या समजतील. जनता दरबारात असंख्य नागरिक आपल्या समस्या घेऊन येतात. त्यांच्या समस्या तत्काळ सोडविण्यास प्राधान्य देण्यासाठी तसेच नागरिकांनी केलेल्या सूचनांवर लगेच कार्यवाही करता येईल. शहरातील नागरिकांच्या समस्या प्रशासनाला समजतील. तसेच त्या विषयांवर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी ते विषय महासभेपुढे आणता येतील.

चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने पिंपरी पालिकेची निवड झाली. त्यामुळे अनेक प्रभागात वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे चार नगरसेवक निवडून आले आहेत. प्रभागातील नागरिक एखाद्या नगरसेवकांकडे तक्रार घेऊन गेल्यास दुस-या नगरसेवकाकडे पाठविले जाते. नगरसेवक एकमेकांकडे बोट दाखवून काम करण्यास टाळाटाळ करत आहेत. नगरसेवकांच्या राजकारणामुळे नागरिकांचे प्रश्न सुटत नाहीत.

तसेच त्या परिसरातील मतदारांनी आपल्याला मतदान केले नाही. त्यामुळे तेथे कोणत्याही प्रकारची विकासकामे केली जाणार नाहीत. याबाबत कोणाकडेही तक्रार करा, अशी उत्तरे नगरसेवकांकडून ऐकायला मिळतात. त्यामुळे नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित राहत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे महापौर आणि आयुक्तांनी महिन्यातून एकदा जनता दरबार घेऊन नागरिकांचे प्रश्न समजावून घ्यावेत, अशी मागणी कदम यांनी केली आहे.

याबाबत बोलताना महापौर नितीन काळजे म्हणाले, जनता दरबार घेण्याची मागणी योग्य आहे. जनता दरबारात शहरातील असंख्य नागरिक सहभागी होतील. त्यांच्या समस्या तसेच शहरातील विविध समस्या प्रशासनाला समजतील. त्याची सोडवणूक करण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. याबाबत आपण सकारात्मक असून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात येथील, असेही त्यांनी सांगितले.