ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बीआरटीला आठ मार्गांची प्रतीक्षा, दोनच रस्त्यांवर सेवा सुरू

पिंपरी, दि. १७ - वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वाढती संख्या विचारात घेता पिंपरी-चिंचवड महापालिकेने १० रस्त्यांवर बीआरटीएस वाहतूक सेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. तथापी, हे नियोजन कागदोपत्री राहत असून केवळ दोन रस्त्यांवर बीआरटीएस सेवा सुरू आहे.

आजमितीला औंध ते रावेत १४.५० किलो मीटर, नाशिक फाटा ते वाकड किलोमीटर या रस्त्यांवर बीआरटीएस सेवा सुरू आहे. काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता १०.७० किलोमीटर, टेल्कोरस्ता १२ किलोमीटरदेहू-आळंदी रस्ता १५.२० किलोमीटर, भक्ती-शक्ती ते किवळे .२० किलोमीटर आणि केएसबी चौक ते हिंजवडी १३.३० किलोमीटर या रस्त्यांच्या विकसनाचे काम सुरू आहे.

तर, नाशिक फाटा ते मोशी १२.२० किलोमीटर रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे. तथापि, त्याचे ६० मीटर रुंदीकरण पालिकेमार्फत केले जाणार आहे. मुंबई-पुणे महामार्गावरील बहुचर्चित दापोडी ते निगडी १२.५० किलोमीटर या रस्त्यावर ऑक्टोबर अखेर बस सेवा सुरू करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.

देहू-आळंदी या १५.२० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. चिंचवड, केएसबी चौक येथील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सध्या ग्रेड सेपरेटरचे काम चालू असून पुढील चार महिन्यात पूर्ण करून दोन्ही ग्रेड सेपरेटर वाहतुकीसाठी खुले करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. सांगवी फाटा येथील उड्डाणपूल ग्रेडसेपरेटरचे काम पूर्ण झाले असून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तसेच हा चौक सिग्नल फ्री झाला असल्याने वाहतूक कोंडीपासून वाहनचालकांची सुटका झाली आहे.

निगडी भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक किवळे ४५ मीटर रुंद रस्त्याचे काम चालू आहे. निसर्ग दर्शन सोसायटी येथे रेल्वे लाईनवर उड्डाणपूल बांधणे, पुणे-आळंदी रस्ता, दापोडी येथे हॅरीस पुलाला समांतर पूल बांधणे, डांगे चौक ते मनपा हद्द हिंजवडी रस्ता विकसित करणे, साई चौक जगताप डेअरी येथे उड्डाणपूल बांधणे, साई चौक जगताप डेअरी येथे ग्रेड सेपरेटर बांधणे, भक्ती-शक्ती चौक निगडी येथे ग्रेड सेपरेटर बांधण्याचे काम सुरू आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या आजमितीला १७ लाख ५० हजार आहे. तर, वाहनांची संख्या १० लाख इतकी असून वाहनांच्या संख्येत दिवसे-दिवस भर पडत आहे. या वाहनांचा विचार करता शहरातील वाहतूक व्यवस्था गतिमान करणेकामी दहा रस्ते विकसित करण्यात येत आहेत.