ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

पालिकेतील कामासंदर्भातील माहिती एसएमएसद्वारे मिळणार

पिंपरी, दि. १८ - कोणत्याही सरकारी कार्यालयात गेल्यावर पहिल्याच फेरीत अनेकदा काम होत नाही. त्यासाठी वारंवांर फे-या माराव्या लागतात. त्यामुळे नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागतो आणि वेळही वाया जातो. नागरिकांच्या वेळेचे महत्व लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील नागरिकांना त्यांच्या पालिकेतील कामासंदर्भातील माहिती 'एसएमएस'द्वारे मोबाईलवर देण्याचा निर्णय घेतला आहे. ही ऑनलाईन सोय उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेमार्फत ठेकेदाराला १६ लाख २० हजार रूपये देण्यात येणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागाकडील ४० ते ४५ प्रकारच्या सेवा ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्या आहेत. यामध्ये नागरवस्ती विकास योजना, नगररचना विभाग, महापालिका क्रीडांगण बुकींग, मालमत्ताकर विभाग, एलबीटी विभाग, महापालिका रूग्णालये, बांधकाम परवानगी आदी विभागातील अनेक सेवा पुरविल्या जातात. अशा कामांसाठी नागरिक अर्ज करतात. आपले काम पूर्ण होत आले आहे की नाही याची माहिती घेण्यासाठी नागरिकांना प्रत्येकवेळी महापालिका कार्यालयात यावे लागते. यामध्ये त्यांचा नाहक वेळेचा अपव्यय होतो.

ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने अशा कामांसाठी नागरिकांना महापालिका कार्यालयात येता या कामासंबंधीची माहिती त्यांना एसएमएस द्वारे पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, नागरिकांना त्यांच्या कामाची इत्यंभुत माहिती देण्यासाठी महापालिकेच्या माहिती-तंत्रज्ञान विभागामार्फत एक कोटी एसएमएस पॅक खरेदीसाठी ऑनलाईन निविदा दरपत्रक मागविण्यात आले.

त्यामध्ये तीन निविदा धारकांनी दरपत्रक सादर केले. त्यापैकी चिंचवड येथील टेक ९ सर्व्हीसेस यांनी १६ लाख २० हजार हा लघुत्तम दर सादर केला. महापालिका मुख्य लेखापरीक्षक पद्मश्री तळदेकर आणि अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांनी हे दर स्वीकृत केले आहेत.