ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रिंगरोड बाधितांचे पिंपरीत उद्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

पिंपरी, दि. १९ - कालबाह्य रिंग रोड रद्द करणे, घरे नियमित करावीत, पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण बरखास्त करण्यात यावे, १०० टक्के शास्तीकर माफ करावा अशा विविध मागण्यांसाठी रिंगरोड बाधित नागरिक उद्या (गुरुवारी) पिंपरीत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात गुरुवारी सकाळी नऊ वाजता उपोषणाला सुरुवात होणार आहे. रिंग रोड बाधित नागरिकांनी मोठ्या संख्येने उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन, घरे वाचवा संघर्ष समितीने केले आहे.

'एचसीएमटीआर' (रिंगरोड) स्त्यामुळे वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, बिजलीनगर, बळवंतनगर, थेरगाव आणि पिंपळेगुरव परिसरातील दोन हजाराहून अधिक घरे पाडली जाणार आहेत. घरे पाडण्यास रहिवाशांच्या तीव्र विरोध आहे. परंतु, प्राधिकरणाने रिंगरोडवरील दुकांना खाली करण्याच्या नोटीस दिल्या होत्या. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

घरे पाडण्यास तीव्र विरोध करत रिंग रोड बाधित नागरिकांनी प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. त्यानंतर महिलांनी विविध ठिकाणी मेळावे घेऊन घरे पाडण्यास विरोध केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रे पाठऊन रिंगरोडवरील रस्त्यावरील घरे पाडू नये, अशी मागणी केली आहे. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयावर देखील मोर्चा काढला होता.

आता गुरुवारी रिंग रोडबाधित नागरिक कालबाह्य रिंग रोड बरखास्त करावा, शास्तीकर १०० टक्के माफ करावा अशा विविध मागण्यांसाठी पिंपरी चौकात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. रिंग रोड बाधित नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन, घरे वाचवा संघर्ष समितीने केले आहे.