ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

परळी बाजार समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा, भाजपचा दारुण पराभव

परळी, दि. १५ - विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या परळी बाजार समिती निवडणुकीत धनंजय मुंडेंनी बाजी मारली आहे. राष्ट्रवादीने १८ पैकी १४ जागा जिंकत भाजपचा दारुण पराभव केला आहे. भाजपला केवळ जागांवर समाधान मानावे लागले आहे. परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात होते.

जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक सदस्य निवडून आले असतानाही सुरेश धस यांच्या बंडखोरीमुळे सत्ता स्थापन करण्यास राष्ट्रवादीला अडचण निर्माण झाली होती. जिल्हा परिषदेच्या सर्व राजकारणामागे पंकजा मुंडे असल्याचे बोलले जात होते. याच सर्व प्रकाराचा धनंजय मुंडे यांनी परळी बाजार समितीत बदला घेतला आहे.

गेल्या तीस वर्षांपासून परळी बाजार समिती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याच ताब्यात होती. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे मोठे बंधू पंडितअण्णा मुंडे हेच या बाजार समितीचा कारभार बघायचे. पंडित अण्णांनी बंडखोरी केल्यानंतर या बाजार समितीवर धनंजय मुंडेंनी एक हाती अंमल ठेवला होता. आता तीच परळी बाजार समिती पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या हातात आली आहे.