ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

वर्सोवा ब्रिज बंद, मालिका कलाकारांनाही फटका

मुंबई, दि. १५ - वर्सोवा ब्रिज बंद झाल्याचा फटका जसा सामान्यांना बसतो आहे, तसाच तो सिनेमा आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांनाही बसतो आहे. वसईतील कामण, चिंचोटी आणि पोमण परिसरात अनेक स्टुडिओ आहेत. नामवंत मालिकांचं या स्टुडिओत शूटिंग सुरु आहे. पण वाहतुक कोंडीमुळे कलाकार आणि कामगार वेळेवर पोहचू शकत नसल्यामुळे कलाकारांनी शूटिंगकडे पाठ फिरवली आहे.

गेल्या आठ महिन्यांपासून दुरुस्तीच्या नावाखाली वर्सोवा पुलावर वाहतूक कोंडी होते आहे. कालपासून तर जुना पूलही वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद करण्यात आला. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लवकर या वाहतूक कोंडीतून सुटका करावी अशी मागणी कलाकारांनी केली आहे.

वसई परिसरातील मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत चिंचोटी, कामण, परिसरात मालिका आणि सिनेमांटे स्टुडीओ आहेत. या स्टुडीओंमध्ये सध्या भाभीजी घरपे है, गंगा, रुद्र के रक्षक, महाबली हनुमान, देवंशी, राजारांनी यासह अन्य मालिकांची शूटिंग सुरु आहे. या शूटिंगसाठी मुंबई, ठाणे, कल्याण, मिरारोड या परिसरातील मोठ-मोठे कलाकार आणि बॅकस्टेज कामगार मंडळी शूटींगसाठी येतात.

मागील आठ महिन्यांपासून दुरुस्तीच्या नावाखाली वर्सोवा पुलावर वाहतुक कोंडी होत आहे. रविवारपासून तर जुना पुल हा वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मालिका आणि सिनेमांच्या शूटिंगसाठी येणाऱ्या कलाकारांना पुलावरील वाहतूक कोंडीतच तासन् तास अडकून पडावं लागत असल्यामुळे त्यांना वेळेवर शूटिंगसाठी जाता येत नाही. शूटिंगवरुन सुटले तर वेळेवर घरी पोहचता येत नाही.