ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बहिणाला पळवून नेले, मेव्हण्यांनीच केला किर्तनकार इभुते यांचा खून

शिक्रापूर, दि. १५ - किर्तनकार बालाजी सायबू इभूते यांचा त्यांच्याच दोन मेव्हण्यांनी खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. लहान बहिणीला पळवून नेल्याचा राग मनात धरून डोक्यात दगड घालून हत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोन्ही मेव्हण्यांना काल कर्नाटक येथून (दि.१३) अटक केली आहे.  गुंडूजी गोपाळराव कळसे (वय २४) आणि त्याचा भाऊ प्रकाश गोपाळराव कळसे (वय २६) दोघेही राहणार औराद जि.बिदर, कर्नाटक असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी इभुते त्यांची पत्नी मीरा विभुते यांचा ११ वर्षापुर्वी प्रेमविवाह झाला होता. मात्र हे या दोघांचेही दुसरे लग्न होते. इभुते हे प्रत्येक पंढरपुरवारीला कळसे यांच्या घरी थांबत त्यातूनच कळसे यांची ओळख झाली होती. 

दरम्यान, दोन वर्षापूर्वी इभुते यांनी गुंडाजी यांना बोलताना मीच तुझ्या मोठ्या बहिणाला पळवले आणि तुझ्या समोरच दुसरीलाही पळवीण अशी चिथावणी दिली होती. त्यानंतर १० मे रोजी इभुते यांनी त्यांची छोटी मेव्हणी साडू यांना आपण रहात असलेल्या चाळीत राहण्यास बोलावले. त्यांना भाड्याने खोली मिळवून देऊन त्यांचे सामानही खोलीत स्थलांतरीत केले होते. ही माहिती गुडुंजी प्रकाश कळसे या दोघांना कळताच मनात राग धरुन इभुते यांचा बुधवारी (दि.१०) मध्यरात्री अडीचच्या सुमारास शिक्रापूर बस स्थानकाच्या मागे डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला.

याबाबत शिक्रापूर पोलीसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून आज दोघांनाही न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे.