ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडविल्याने गटारी तुंबल्या

तळेगाव, दि. १५ -  तळेगाव स्टेशन येथील शुभम कॉम्लेक्स समोर अज्ञातांनी पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवल्याने तुंबलेल्या गटारांमुळे आणि सलग दोन दिवस वळवाच्या पावसाचे पाणी परिसरातील काही दुकानांसमोर आणि खाजगी कार्यालयात घुसल्याने व्यापा-यांना मनस्ताप सहन करावा लागला.
तळेगाव शहर तळेगाव स्टेशन परिसरात शुक्रवारी आणि शनिवारी सायंकाळी सलग दोन दिवस वादळी वा-यासह अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या.यामुळे चाकण रस्त्यालगतच्या बहुतांशी गटारी तुंबल्याने या पावसाचे पाणी थेट लगतच्या इमारतीच्या तळमजल्यातील दुकाने आणि कार्यालयात घुसले. पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. तळमजल्यातील अनेक दुकाने कार्यालयात गुढघाभर पाणी साचले. यामुळे कागदपत्रे, फाईल्स ,फर्निचर आणि इतर सामान भिजल्याने व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले. 
पाणी अडवून गटारीचा नैसर्गिक प्रवाह बंद करण्यात आल्याने समर्थ छाया अपार्टमेंट, भक्ती अपार्टमेंट शुभम काॅम्प्लेक्स येथील तळमजला परिसरात पाणीच पाणी झाले. या ठिकाणी असलेल्या नैसर्गिक प्रवाहाच्या गटारीस अडथळा निर्माण करण्यात आल्याने पाणी निच-याची समस्या निर्माण झाली आहे. सद्य स्थितीत पाण्याचा निचरा योग्य रितीने होत नसल्याने या समस्येस सामोरे जावे लागत असल्याचे व्यापा-यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, आरोग्य समितीचे सभापती अमोल शेटे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. नगर परिषदेच्या आरोग्य खात्याच्या वतीने गटारीतील अडथळा दूर करून नैसर्गिक प्रवाह मोकळा करण्यात आला.मात्र अज्ञातांनी हा प्रवाह पुन्हा अडवला आहे .हा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी स्टेशन भागातील व्यापा-यांचे शिष्टमंडळ सोमवारी मुख्याधिकारी वैभव आवारे,नगराध्यक्षा चित्रा जगनाडे ,आरोग्य समितीचे सभापती अमोल शेटे यांची भेट घेणार असून निवेदन देणार असल्याचे व्यापा-यांच्या वतीने सांगण्यात आले.