ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम कालवश

नाशिक, दि. १५ - क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम कालवश झाले आहेत. व्याख्यान देण्यासाठी गेले असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने भीष्मराज बाम यांचं निधन झालं. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी सुधा, मुलगा नरेंद्र आणि अजित असा परिवार आहे. क्रीडा मानसशास्त्रज्ञ म्हणून भीष्मराज बाम यांचं नाव क्रीडा क्षेत्रात अत्यंत आदराने घेतलं जातं. ऑलिम्पिकसह विविध क्रीडा स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करणाऱ्या अनेक खेळाडूंना भीष्मराज बाम यांनी मार्गदर्शन केले आहे.

सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, अंजली भागवत, कविता राऊत, पी. गोपीचंद यांच्यासह अनेक खेळाडूंना भीष्मराज बाम हे मार्गदर्शक म्हणून लाभले. ‘मार्ग यशाचा’, ‘संधीचं सोनं करणारी इच्छाशक्ती’, ‘विजयाचे मानसशास्त्र’, ‘मना सज्जनायांसारखी पुस्तकंही भीष्मराज बाम यांनी लिहिली. या पुस्तकांचा हिंदी, पंजाबी आणि तामिळ भाषेतही अनुवाद झाला. याचबरोबर मराठीतील अनेक वृत्तपत्रांमध्ये बाम यांनी स्तंभलेखनही केले.

१९६३ साली महाराष्ट्र पोलिस सेवेत पोलिस उपाधीक्षक म्हणून ते रुजू झाले. १८ वर्षांच्या सेवेनंतर त्यांची गृहमंत्रालयात महत्त्वाच्या पदावर नेमणूक झाली. त्यानंतर पुढे ते पोलिस महानिरिक्षक म्हणून निवृत्त झाले. ‘दक्षताया पोलिस मासिकाचे ते दोन वर्षे मुख्य संपादकही होते. भीष्मराज बाम यांच्या अंत्यदर्शनासाठी पोलिस अधिकारी, खेळाडू आणि मान्यवरांची गर्दी झाली आहे. शनिवारी सकाळी १० वाजता त्यांच्यावर अंत्यविधी होणार आहे.