ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

दानवेंना सद्बुद्धी मिळण्यासाठी राष्ट्रवादीचा बदलापुरात यज्ञ

बदलापूर, दि. १५ - शेतकऱ्यांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना सद्बुद्धी मिळावी, यासाठी बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने यज्ञ करण्यात आला. रावसाहेब दानवे यांनी तूर खरेदीच्या मुद्द्यावरन गेल्या आठवड्यात शेतऱ्यांबद्दल असंसदीय भाषा वापरत टिप्पणी केली होती. यावरुन राज्यभरात त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादीन काँग्रेसने थेट दानवेंचं मानसिक संतुलन सुधरावं आणि त्यांना सद्बुद्धी मिळावी, यासाठी बदलापूरच्या बेलवली भागात शहराध्यक्ष कालिदास देशमुख यांच्या उपस्थितीत यज्ञ केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रावसाहेब दानवेंचे मानसिक उपचार करावेत, अन्यथा राष्ट्रवादीच्या वतीने वर्गणी काढून त्यांचे उपचार करण्यात येतील, अशा शब्दात यावेळी राष्ट्रवादीने भाजपला फटकारलं.

राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली, तरी रडतात XXX, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं. कापसाला, तुरीला, डाळीला भाव नाही असली गाणी बंद करा, अशी मुक्ताफळं दानवेंनी उधळली. याशिवाय दानवे यांनी असंसदीय भाषेचा वापरही केला होता

... तर मी दिलगिरी व्यक्त करतो - दानवे

मी कार्यकर्त्यांबद्दल अपशब्द वापरला, शेतकऱ्यांबद्दल नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. शेतकऱ्यांची मनं दुखावली असतील तर दिलगिरी करतो असं म्हणत त्यांनी सशर्त माफी मागितली. त्यामुळे झालेल्या चुकीबद्दल दानवे माफी मागत आहेत, की उपकार करत आहेत, असा प्रश्न आता विचारला जात आहे.