ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

लोअर बर्थसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता

मुंबई, दि. १६ - रेल्वेच्या स्लीपर डब्ब्यात लोअर बर्थ बुक करायचा असेल तर आता तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. तेही थोडेथोडके नाही तर ५० ते १०० रुपये जास्त. कारण रेल्वे प्रशासन लवकरच हे नवं धोरण आणण्याच्या तयारीत आहे. तिकीट बुक करताना प्रवाशांना बर्थचा पर्याय निवडावा लागतो. यावेळी प्रवासी लोअर बर्थ निवडतात. महिला वर्ग, गरोदर स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिक नेहमी लोअर बर्थला प्राधान्य देतात. चार्ट बनवताना रेल्वे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा विचार करतात.

लोअर बर्थच्या याच वाढत्या मागणीनुसार त्यावर अधिकचा दर आकारण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असल्यास आता मूळ तिकीटासोबतच अतिरिक्त ५० रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे. रेल्वेचं उत्पन्न वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासन नवनवीन शक्कल लढवताना दिसतं. हा देखील त्याचाच एक भाग आहे. पण महिला, गरोदर माता आणि ज्येष्ठांसाठी हा निर्णय जुलमी ठरु शकतो.

रेल्वे मंत्रालयानुसार, जर लोअर बर्थसाठी अतिरिक्त रुपये वसूल केले तर लोकांची मागणी कमी होईल, परिणामी लोअर बर्थ ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध होईल.