ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सोयाबीन-तुरीनंतर मिरची रखडली, १५ रुपये किलोनं विक्रीची वेळ

चंद्रपूर, दि. १६ - आधी कांदा, मग तूर आणि आता शेतकऱ्यांच्या मिरचीवरही संकट आलं आहे. गेल्या वर्षी तब्बल दीडशे रुपये किलो दराने विकली जाणारी मिरची यंदा १५ रुपये किलोवर पोहोचली आहे. आंध्र आणि तेलंगणातही अशीच स्थिती होती. मात्र तिथल्या सरकारनं हमीभाव दिला. आता फडणवीस सरकार शेतकऱ्यांना तारणार की मारणार हे पाहणं महत्वाचं आहे. घरात मिरचीदारात मिरची.. अंगणात मिरचीआणि शिवारातही मिरचीचएकरी पदरचे ५० ते ७० हजार रुपये ओतून, आणि रक्ताचं पाणी करुन, चंद्रपूर जिल्हयातल्या शेतकऱ्यांनी लाल मिरची पिकवली. मात्र सरकारच्या उदासीनतेमुळे जाळ आणणाऱ्या मिरचीला आग लावण्याची वेळ आली आहे.

गेल्या वर्षी १५० रुपये किलोनं विकलेल्या मिरचीला आता फक्त १५ रुपये भाव आहे. चंद्रपूरच्या कोठारी, तोहोगाव, राजुरा, परसोडी, लाठी आणि चनाखा भागात मिरचीचं उत्पन्न घेतलं जातं. कधी नव्हे ती निसर्गानं चांगली साथ दिल्यामुळे मिरचीचं बंपर उत्पन्न आलं. मात्र यंदा शेतकऱ्याला बाजाराच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागत आहे.

फडणवीस सरकारनं ठरवलं तर मिरची उत्पादकांना या संकटातून कसं तारता येऊ शकतं, हे आंध्र, तेलंगणानं दाखवून दिलं आहे. महाराष्ट्रापेक्षा गरीब असलेल्या तेलंगणा आणि आंध्रनं मिरची उत्पादकांना हजार २५० रुपयांचा हमी भाव दिला.

केंद्र सरकार आंध्रकडून ८८ हजार ३०० टन तर तेलंगणाकडून ३३ हजार ७०० टन मिरची खरेदी करणार आहे. जर मिरची खरेदीत नुकसान झालं तर केंद्र आणि राज्य सरकार अर्धा-अर्धा भार उचलणार आहेत. तूर खरेदीसाठी सरकारनं ज्या प्रमाणे पुढाकार घेतला, तसा मिरची उत्पादकांसाठी का घेतला जात नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तूर, सोयाबीन, मिरची, मोसंबी, डाळिंब अशा कुठल्याच पिकाला भाव नसेल तर शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट कसं होणारहे मोदी किंवा फडणवीस सांगू शकतील का?