ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

दहा रुपयांचे कॉईन घेण्यास नकार, शेतकऱ्यांचं बँकेसमोर धरणं

नाशिक, दि. १६ - बाजारात दहा रुपयांचा कॉईन घेण्याबाबत ग्राहकांमध्ये जो गोंधळ आहे, त्यामध्ये आता बँकांचीही भर पडली आहे. कारण ग्राहक आमच्याकडून दहा रुपयांचे कॉईन घेत नाहीत, म्हणून आम्हीही ते घेणार नाही, असं अजब स्पष्टीकरण नाशिकमधील एका बँकेने दिलं आहे. दहा रुपयांचे कॉईन घेण्यासाठी नकार दिल्याने दोन शेतकऱ्यांनी नाशिकमधील बँक ऑफ इंडियासमोर आंदोलन सुरु केलं आहे. १० हजार रुपयांचे हजार कॉईन या शेतकऱ्यांनी बँकेसमोर टाकले आहेत.

शिवाजी वाघ आणि नामदेव वाघ असं या शेतकऱ्यांचं नाव आहे. रोज १०० रुपयेच घेऊ, म्हणजे हजार रुपये भरण्यासाठी ७०वेळा बँकेत या, असं बँकेचं म्हणणं आहे. प्रशासनाच्या आदेशानंतरही दहा रुपयांचे कॉईन घेण्यासाठी बँकांकडून टाळाटाळ केली जात असल्याचं यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आलं आहे.