ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

वळवण पुलावर खासगी बसला अपघात, चार वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

लोणावळा, दि. १६ - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर लोणावळाजवळील वळवण ब्रीजवर खासगी बस पलटली होऊन अपघात झाला आहे. यामध्ये २० प्रवासी जखमी झाले असून एका चार वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जखमींमध्ये लहान मुलांची संख्या अधिक असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना निगडीतील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये सहा लहान मुलांचा समावेश असून तीन जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सिद्धेश्र्वर ट्रॅव्हल्सची बस मुंबई येथून कराडकडे निघाली होती. त्यावेळी लोणावळ्याजवळी वळवण पुलावर बस अचानक पलटी झाली. अपघातावेळी बसमध्ये ५२ प्रवासी होते. त्यापैकी २० प्रवासी जखमी झाले. घटनेनंतर जखमींना तात्काळ निगडीतील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, जखमींमध्ये सहा बालकांचा समावेश असून त्यातील तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. घटनेनंतर घटनास्थळी महामार्ग पोलीस लोणावळा पोलिसांनी धाव घेत जखमींना मदत केली. अपघातातील सर्व जखमी प्रवासी सातारा, सांगली या भागातील असल्यचे समजते.