ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

निर्माते अतुल तापकीर आत्महत्येप्रकरणी पत्नीला अटक

पुणे, दि. १६ - चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अतुल तापकीर यांची पत्नी प्रियांका, तिचा मावसभाऊ आणि दोन मानलेल्या भावांना बेड्या ठोकल्या आहेत. अतुल तापकीर यांनी शनिवारी पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. पुण्यातील हॉटेल प्रेसिंडेटमध्ये विष पिऊन त्यांनी जीवन संपवलं. अतुल तापकीर हेढोल ताशाचित्रपटाचे निर्माते आहेत.

अतुल तापकीर यांनी आत्महत्येपूर्वी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. ज्यामध्ये पत्नीवर आरोप करण्यात आले आहेत. ‘ढोल ताशासिनेमाच्या अपयशानंतर कर्जबाजारीपणा आला. पण यातून सावरण्यासाठी वडिलांनी, बहिणींनी मदत केली. मात्र पत्नी प्रियांकाने आपल्याला सतत त्रास द्यायला सुरुवात केली. वडिलांना आणि मला मानसिक त्रास दिला, याच उद्विग्नतेतून मी जीवन संपवत आहे, अशी फेसबुक पोस्ट अतुल तापकीर यांनी लिहिली आहे.

यानंतर पत्नी प्रियांकावर डेक्कन पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर आज ती स्वत:हून डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये हजर झाली. यानंतर तिच्यासह चार जणांना पोलिसांनी आज अटक केली. त्यांना आज पुणे कोर्टात हजर करणार आहेत.