ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या तिघांनी ३८ लाख लांबवले

डोंबिवली, दि. १७ - एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या तिघांनीच पैशांवर डल्ला मारल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. या तीन महाठगांनी ३८ लाख ६० हजार रुपयांची रक्कम लांबवली. १५ मे रोजी संध्याकाळी ही घटना घडली. हे सर्व आरोपी रायटर सेफगार्ड कंपनीचे कर्मचारी आहेत. ही कंपनी एटीएम सेंटरमध्ये पैसे भरण्याचं काम करते.

आरोपी राकेश पवार, नयन भानुशाली, ज्योतिष गुप्ता ज्या एटीएममध्ये पैसे भरले, तिथे पुन्हा गेले. एटीएम उघडण्यासाठी जो पासवर्ड असतो, त्याचा वापर करुन मशिन उघडलं. चारही एटीएममधून पैसे काढले आणि तिथून पोबारा केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी १६ मे रोजी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु आहे. दरम्यान आरोपींचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे.