ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचं निधन

मुंबई, दि. १८ - कणखर अभिनयाने सिनेसृष्टीत वेगळेपण जपणारी हरहुन्नरी अभिनेत्री रीमा लागू यांचं निधन झालं. त्या ५९ वर्षांच्या होत्या. बॉलिवूडची ग्लॅमरस आई म्हणून रीमा लागू परिचीत होत्या. छातीत दुखू लागल्याने त्यांना काल मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. रीमा लागू यांनी मराठी, हिंदी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात मोठं योगदान दिलं. पूर्वाश्रमीच्या नयन भडभडे लग्नानंतर रीमा लागू या नावाने ओळखल्या जात.

रीमा लागू यांनी सुमारे चार दशकं चित्रपट आणि नाट्य सृष्टी गाजवली. रीमा यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून काम केलं आहे. बॉलीवूडमधील मायाळू आई म्हणूनही त्या परिचीत होत्या. ‘कुछ कुछ होता हैमध्ये काजोलची आई, ‘हम आपके हैं कौनमध्ये माधुरी दीक्षितची आई, ‘वास्तवमध्ये संजय दत्तची आई आणि मैने प्यार किया सिनेमात सलमान खानची आई, यासारख्या दमदार भूमिका साकारल्या आहेत.

रीमा लागू यांचा जन्म १९५८ मध्ये झाला. घरातूनच त्यांना अभिनयाचे धडे मिळाले. त्यांची आई मंदाकिनी भडभडे यांचंलेकुरे उदंड जाहलेहे नाटक प्रचंड गाजलं होतं. रीमा लागू यांचं पुण्यात शालेय शिक्षण सुरु होतं, त्याचवेळी त्यांना अभिनयाचे धडेही देण्यात आले. माध्यमिक  शिक्षणानंतर त्यांनी अभिनयाचे व्यावसायिक शिक्षण घेतलं. त्यानंतर मराठी रंगभूमीवरुन त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाय ठेवला.

विवेक लागू यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर नयन भडभडे या रीमा लागू म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मात्र काही वर्षानंतर दोघेही वेगळे झाले. मृण्मयी लागू या रीमा लागू यांच्या कन्या. त्या स्वत:ही नाट्य, सिनेअभिनेत्री आहेत. मैंने प्यार किया, हम आपके हैं कौन, हम साथ साथ हैं, वास्तव, साजन, कुछ कुछ होता है, आशिकी, कयामत से कयामत तक हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत. तर श्रीमान श्रीमती, तू तू मैं मैं या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत. घर तिघांचं हवं, चल आटप लवकर, झाले मोकळे आकाश, तो एक क्षण, पुरुष बुलंद, सविता दामोदर परांजपे, विठो रखुमाय ही नाटके त्यांच्या अभिनयाने अजरामर झाली आहेत.