ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पोलीस निरीक्षक मोरेंवर कारवाईसाठी रमेशन यांचे मंत्रालयासमोर उपोषण

मुंबई, दि. १८ - वारंवार तक्रार देऊन तसेच पुरावे सादर करूनही देहूरोडचे पोलीस निरीक्षक अरुण मोरे यांच्यावर कारवाई होत नसल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते हे उद्यापासून (दि.१८) मुंबईत मंत्रालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहेत.

देहूरोड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अरुण मोरे यांनी एप्रिलमध्ये देहूरोड किवळे येथील मुकाई चौकातील पंजाबी स्वाद या हॉटेलवर छाप टाकला होता. त्यावेळी त्यांनी हॉटेलमध्ये काम करणा-या कर्मचाऱ्याला मारहाण करून पंचनामा करता गल्ल्यातील रक्कम काढून घेतली. रक्कम काढत असताना हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये सर्व दृष्य कैद झाले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दोन हजारांच्या नोटा असल्याचे स्पष्ट दिसत आहे. परंतु मोरे यांनी स्टेशन डायरीमध्ये गुन्हा नोंद करताना कमी रक्कम दाखवली. श्रीजीत रमेशन यांनी हॉटेल चालकाकडे याची चौकशी केली. त्यावेळी हॉटेल चालकाने १२ ते १३ हजार रुपये गल्ल्यामध्ये असल्याचे सांगितले.

याबाबत रमेशन म्हणाले की, मी मोरे यांच्यावर कारवाई होत नाही म्हणून पुणे विधान भवनासमोर ही उपोषण केले होते. यावेळी मला जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी तातडीने सर्व चौकशी अहवाल मागवू, असे सांगितले होते. त्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनाही यांसदर्भात तक्रार केली होती. मात्र, कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे मी उद्यापासून मुंबईत मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार आहे, असे रमेशन यांनी सांगितले.