ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सोनिया गांधींचा प्रस्ताव शरद पवारांनी फेटाळला

मुंबई, दि. १८ - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रपती निवडणुकीत उमेदवार बनण्याचा प्रस्ताव काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ठेवला होता. मात्र शरद पवार यांनी हा प्रस्ताव धुडकावला आहे.

पत्रकारांशी बातचीत करताना नवाब मलिक यांनी दावा केला आहे की, “हा प्रस्ताव स्वत: सोनिया गांधींनी शरद पवारांसमोर ठेवला होता, जो पवारांनी फेटाळला. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार नाही, असंच शरद पवार कायम सांगत आले आहेत.”

राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे की, यूपीएच्या सर्व घटकपक्षांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एक संयुक्त उमेदवार द्यावा,” असं नवाब मलिक म्हणाले. शरद पवारांनी राष्ट्रपतीपदाची उमेदवारी घ्यावी, अशी यूपीएच्या अनेक नेत्यांची इच्छा आहे. परंतु काही दिवसांपूर्वी मुंबईत पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले होते की, “एनडीएकडे राष्ट्रपदीपदासाठी स्वत:चे उमेदवार जिंकवण्यासाठी आवश्यक बहुमत आहे. त्यामुळे या निवडणुकीत मोठे उलटफेर होण्याची शक्यता नाही.”

दुसरीकडे, यूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी संयुक्त उमेदवार देण्याबाबत बातचीत सुरु आहे. यासंदर्भात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधींची भेट घेतली होती. यानंतर ममतांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली. दोघांमध्ये विविध मुद्द्यांसह राष्ट्रपती निवडणुकीचीही चर्चा झाली.