ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

विठ्ठलवाडी स्टेशन अधिकाऱ्यावर लगेज माफियांचा हल्ला

कल्याण, दि. १८ - कल्याण रेल्वे स्थानकातील मुख्य वाणिज्य निरीक्षक संदीप तिवारी यांच्यावर विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात लगेज माफियांनी हल्ला केला. संदीप तिवारी असं या रेल्वे अधिकाऱ्याचे नाव असून रेल्वेमध्ये बेकायदेशीरपणे सामान चढवण्याला विरोध केल्याने हा हल्ला झाल्याची माहिती आहे.

रेल्वेतून जाणाऱ्या लगेजबाबत तिवारी यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. यासंदर्भात विठ्ठलवाडी स्थानकात सामानाची तपासणी करत तिवारी यांनी बेकायदेशीर लगेजविरोधात कारवाई सुरु केली. त्याचा राग आल्याने तिथे असणाऱ्या मुसा नामक व्यक्तीने बिअरच्या बाटलीच्या काचेच्या साहाय्याने आपल्यावर वार केल्याचा दावाही तिवारी यांनी केला आहे.

सुदैवाने हा वार आपण हातावर झेलल्याने केवळ हातालाच दुखापत झाल्याचं तिवारींनी सांगितले. कल्याण स्थानकामधील एका टीसीच्या समोर हा हल्ला करण्यात आला. तिवारी यांना कल्याण रेल्वेच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

यापूर्वी ठाण्याचे वाणिज्य निरीक्षक संजय गुप्ता यांच्यावर कोपर रेल्वे स्थानकात अशाच प्रकारे हल्ला झाला होता.