ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मोबाईल चार्जिंग लावताना शॉक लागून मृत्यू

लातूर, दि. १९ - मोबाईल चार्जिंगला लावताना तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लातूरमधील तळेगावात घडली. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे १७ वर्षाच्या तरुणाला शॉक लागल्याचा दावा, तेळगावच्या गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळेच तरुणाचा मृतदेह थेट महावितरणच्या कार्यलयासमोर ठेवण्यात आला.

तळेगावात ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्या भागात विद्युत पुरवठा अनियमीत असणे, व्होल्टेज कमी -जास्त होणे असे प्रकार वारंवार घडत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. याच कारणामुळे ही दुर्घटना घडल्याचा दावाही करण्यात येत आहे. इतकंच नाही तर यापूर्वी अचानक विद्युत पुरवठा कमी-जास्त होणे, हाय व्होल्टेजमुळे याच गावातील  अशोक लावटे, दत्ता चौधरी या दोन नागरिकांचा शॉक लागून मृत्यू झाला होता. आता पुन्हा तशीच घटना घडल्याने गावकरी आक्रमक झाले आहेत.

या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी सकाळी च्या सुमारास शिरुर अनंतपाळ इथल्या महावितरणच्या कार्यालयासमोर मृतदेह आणून ठेवला होता. पण साडेअकरा वाजेपर्यंत महावितरण कार्यालय उघडलंच नव्हतं. जोपर्यंत गावातील ही समस्या दुरुस्त होत नाही, डीपी बसत नाही, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाहीतोपर्यंत मृतदेह हलवणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.