ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

मुंबई-गोवा ८.३० तासात, तेजस एक्स्प्रेस २२ मेपासून ट्रॅकवर

मुंबई, दि. २० - भारतीय रेल्वेचा वेग वाढवणारी सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस लवकरच रुळांवर अवतरणार आहे. ही हायटेक ट्रेन मुंबईत दाखल झाली आहे. तेजस ट्रेन २२ मेपासून मुंबईच्या सीएसटीहून गोव्याच्या करमाळी स्टेशन असा प्रवास करणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिल्लीच्या सफदरजंग स्टेशनवर या ट्रेनची पाहणी केली. सीएसटी स्टेशनवरुन सोमवारी सुरेश प्रभू या गाडीला हिरवा झेंडा दाखवतील. तेजस एक्सप्रेसचा पहिला रॅक कपूरथलाच्या रेल्वे कारखान्यात बनवला आहे. तेजस ट्रेनच्या डब्ब्याचं डिझाईन सुरेश प्रभूंना आवडलं.

प्रभू पुढे म्हणाले की, तेजस एक्स्प्रेस सर्वात आधी मुंबई आणि गोव्यात धावेल. त्यानंतर मुंबई-अहमदाबाद, आनंद विहार-लखनौ आणि दिल्ली-चंदीगडमध्ये चालवण्यात येईल. २०० किमी प्रतितास वेगाने धावणारी तेजस ही देशातील पहिली ट्रेन असेल. तेजस एक्स्प्रेसचा प्रत्येक डब्बा बनवण्यासाठई रेल्वेला कोटी २५ लाख रुपये खर्च करावे लागले आहे. याचे दरवाजे स्वयंचलित असतीलशिवाय यात सीसीटीव्ही कॅमेरा, कॉल बेल, एलईडी टीव्ही, यूएसबी चार्जिंग इत्यादी सुविधाही असतील.

ही ट्रेन आठवड्याच्या पाच दिवस धावणार आहे. ट्रेनला एकूण थांबे आहेत. तेजस एक्स्प्रेस अवघ्या .३० तासात गोव्यातील करमाळी स्टेशनवर पोहोचेल. तर पावळ्यात कोकणातील परिस्थिती पाहता ट्रेनला करमाळीला पोहोचण्यासाठी १०.३० तास लागतील. तेजस ट्रेनमध्ये विमानाप्रमाणे सोईसुविधा पुरवण्यात आलेल्या असून अत्याधुनिक रेल्वे प्रवासाचं स्वप्न तेजसच्या माध्यमातून पूर्ण होतं आहे. संपूर्ण ट्रेनवर खास प्रकारचं पॅटर्न छापण्यात आला आहे. तेजस ट्रेनचं भाडं शताब्दी ट्रेनच्या तुलनेत जास्त असेल.