ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भाजपकडून वेश्याव्यवसाय करायला लावणाऱ्यांना उमेदवारी : धनंजय मुंडे

पनवेल, दि. २१ - पनवेल महापालिकेत भाजपनं वेश्याव्यवसाय करायला लावणाऱ्या गुंडांना तिकीटं दिल्याचा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. कळंबोली इथं शेकाप हा आघाडीतर्फे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला.

भाजपनं प्रभाग क्रमांक १६  मध्ये संतोष शेट्टी या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. संतोष शेट्टीवर वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणे, घरात घुसून मारहाण करणे, असे गंभीर गुन्हा दाखल आहेत. त्यामुळे भाजपनं अशा व्यक्तींना उमेदवारी देऊन भाजपनं आपली लाचारी दाखवून दिली असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदींचाही समाचार घेतला. दिलेला शब्द फिरवण्यात मोदींचा हात कुणीच धरु शकणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.

शिवाय त्यांनी शिवसेनेवरही जोरदार हल्ला चढवला. सरड्यालाही लाज वाटेल असे रंग शिवसेना बदलत आहे, अशी जहरी टीका धनंजय मुंडे यांनी यावेळी केली.

दरम्यान, पनवेल महापालिकेसाठी येत्या 24 मे रोजी मतदान होत आहे. त्यामुळे प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा पनवेल परिसरात होत आहेत. आज प्रचाराचा शेवटचा रविवार असल्याने भाजपसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेसाठी उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत.

मुख्यमंत्री संध्याकाळी खारघर आणि नवीन पनवेलमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. तर उद्धव ठाकरे यांची कामोठेमध्ये एकच सभा होणार आहे.