ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

विधानसभेत GST विधेयक एकमताने मंजूर

मुंबई, दि. २२ - महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक अर्थात जीएसटी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलं आहे. देशात जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार आहेकेंद्रात जीएसटी विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यात शनिवारपासून तीन दिवसाचं विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आलं. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी जीएसटीसंदर्भातील विधेयक एकमताने मंजूर झालं. जीएसटी विधेयक मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे आभार मानले.

या वस्तू/सेवांवर कर नाही - ताजं दूध, अन्न-धान्य, मीठ, तांदूळ, पापड, रोटी, चारा/गवत, कंडोम, गर्भनिरोधक औषधे, पुस्तके, जळाऊ लाकूड, बांगड्या.

या वस्तू/सेवांवर टक्के टॅक्स - चहा, कॉफी, खाद्यतेल, ब्रँडेड अन्नधान्य, सोयाबीन, सूर्यफूल
पनीर, कोळसा, रॉकेल, घरगुती वापराचा एलपीजी, कृत्रिम किडनी, हातपंप, लोखंड, स्टील, लोखंड मिश्रीत धातू, तांब्याची भांडी, झाडू.

या वस्तू/सेवांवर १२ टक्के टॅक्स - ड्राय फ्रूट्स/ सुका मेवा, लोणी, तूप, नमकीन, मांस-मच्छी, दूधापासून बनलेले पेय, साठवलेलं मांस, बायोगॅस, मेणबत्ती, एनेस्थेटिक्सभूलीची औषध,
अगरबत्ती, दंतमंजन पावडर, चष्मा लेन्स, मुलांची ड्रॉईंग बुक्स, कॅलेंडर, एलपीजी स्टोव्हज,
नट,बोल्ट, पेंच, ट्रॅक्टर, सायकल, LED लाईट, खेळाचं साहित्य, आर्ट वर्ककलाकुसरीचं साहित्य.

या वस्तू/सेवांवर १८ टक्के टॅक्स - शुद्ध साखर, कंडेंस्ड मिल्कआटवलेलं दूध, संरक्षित भाज्या, केसांचं तेल, साबण, हेलमेट, नोटबूक, जॅम-जेली, सॉस, सूप, आयस्क्रीम, मॅगीसारखे इंस्टंट फूड, मिनरल वॉटर, पेट्रोलियम जेली, पेट्रोलियम कोक, टॉयलेट पेपर.

या वस्तू/सेवांवर २८ टक्के टॅक्स - मोटर कार, मोटर सायकल, चॉकलेट,बटर, फॅट्स ऑईल,
पान मसाला, फ्रिजस, परफ्युम, डिओड्रंट, मेकअप साहित्य, वॉल पुट्टी, भिंतीचे रंग, टूथपेस्ट, शेविंग क्रीम, आफ्टर शेव, लिक्विड सोप/हॅण्डवॉश, रबर टायर, चामडी बॅग, मार्बल,ग्रेनाईट, प्लास्टर, मायका, टेम्पर्ड ग्लास, रेजर, डिश वॉशिंग मशिन, पियानो.