ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

तेजसवर समाजकंटकांची वक्रदृष्टी, काचा फोडल्या

पुणे, दि. २२ - भारतीय रेल्वेचा वेग वाढवणारी सुपरफास्ट हायटेक ट्रेन तेजस एक्स्प्रेस सोमवारपासून रुळांवर धावणार आहे. पण त्याआधीच या ट्रेनवर समाजकंटकांची वाकडी नजर पडली आहे. या ट्रेनच्या काचा फोडल्याचं आता समोर आलं आहे.

रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पातील तेजस एक्सप्रेसचा लोकार्पण सोहळा, उद्या सोमवार (२२ मे) रोजी होणार आहे. पण यापूर्वीच या ट्रेनवर दगडफेक करुन त्याच्या काचा फोडल्याचं समोर आलं आहे. दिल्लीकडून मुंबईकडे ही ट्रेन घेऊन जात असताना त्याच्या काचा फोडल्या असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कोकण आणि गोवावासियांसाठी पर्वणी ठरणारी तेजस एक्स्प्रेस सध्या मुंबईत दाखल झाली आहे. अगदी आरामदायक आणि जलद असणारी ही गाडी कोकणवासियांचा वेळ वाचवणार आहे. केवळ साडे आठ तासात मुंबई ते गोवा हा पल्ला गाठता येणार आहे. तेजस ट्रेन ताशी २०० किमी प्रतितास वेगाने धावणार असून, देशातील ही पहिली ट्रेन असेल. तसेच याच्या निर्मितीसाठी रेल्वेने तब्बल कोटी २५ लाख रुपये खर्च केले आहेतपण या ट्रेनला समाजकंटकांनी लक्ष्य केल्याचं समोर आलं आहे.