ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

विधानपरिषदेतच नारायण राणे-अनिल परब यांच्यात रंगला कलगीतुरा

मुंबई, दि. २३ - विधानपरिषेदत काँग्रेस नेते नारायण राणे आणि शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्यातील कलगीतुरा पाहायला मिळाला. शिवसेनेची ताकद कमी झाल्याचे म्हणत राणेंनी सेनेला चिमटा काढला. पण यामुळे आक्रमक झालेल्या अनिल परब यांनी राणेंचा चांगलाच खरपूस समाचार घेतला.

मी, शिवसेनेची ताकद कमी झाली, हे दिसते ती वस्तुस्थिती पाहून बोलत आहे. उद्धव ठाकरे यांनी अकोल्यात केलेल्या भाषणाचा संदर्भ घेऊन मी बोललो आहे. शिवसेनेत पूर्वी बोललेले घडत होते, पण आता तसे घडत नाही. लोकशाहीत सत्तेत असणाऱ्यांनी सत्तेच्या बाजूने बोलायचे असते. विरोधात नाही, असे मला सांगायचे होते, असे नारायण राणे म्हणाले.

मात्र राणेंचे हे बोलणे परब यांच्या जिव्हारी लागल्याने, शिवसेनेची ताकद काय आहे, हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे. तुम्ही शिवसेनेमुळेच खालच्या सभागृहात राजे होतात, मात्र आज तुम्हाला शिवसेनेमुळेच या सभागृहात यावे लागले. त्यामुळे शिवसेनेच्या ताकदीची काळजी तुम्ही करू नका. तुम्ही गेल्यानंतरही शिवसेनेने अनेकदा स्वतःची ताकद दाखवून दिली आहे. परब यावरच थांबले नाहीत, तर ते पुढे म्हणाले, तुम्ही ३९ वर्ष शिवसेनेत होतात. विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्री असताना तुमचा रूबाब होता. तुम्ही आलात की लोकांची झुंबड उडायची. तुम्ही गेला तरी तुमच्या मागे लोकांची गर्दी असायची. आता तुमचा तो रूबाब आहे का? हे तुम्हीच पाहा, असा चिमटाही परब यांनी राणेंना काढाला.