ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शिवसेनेच्यावतीने कर्नाटक बसवर जय महाराष्ट्र

कोल्हापूर, दि. २३ - महापालिका नगरपालिका सदस्यांचे सदस्यत्व जय महाराष्ट्र म्हटल्यावर रद्द करणार असे म्हणनाऱ्या कर्नाटक सरकारची हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही. कोल्हापूरात आज त्यांच्या हुकूमशाही फतव्याला शिवसेनेच्यावतीने कर्नाटक बसवर जय महाराष्ट्रचे फलक लावून उत्तर देण्यात आले. दरम्यान, आज कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसर जय शिवाजी-जय भवानीसह जय महाराष्ट्रच्या घोषणेने दणाणून गेला.

कर्नाटक सरकार कन्नडच्या विरोधात बोलणाऱ्या महापालिका नगरपालिका सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले जाईल. कर्नाटक सीमा भागात जय महाराष्ट्रबोलण्यास बंदी घालण्याचा कायदा करणार असल्याचे कर्नाटकचे नगर विकासमंत्री रोशन बेग यांनी काल म्हटले होते. महाराष्ट्रासह कर्नाटक सीमाभागात यावर तीव्र पडसाद उमटले. कोल्हापूरात शिवसेनेच्यावतीने याला उत्तर देण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानक कर्नाटकमधून कोल्हापूरात येणा-या जाणाऱ्या बस वरती जय महाराष्ट्रचे फलक लावून कर्नाटकच्या नव्या जुलमी निर्णयाला विरोध केला.