ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

डॉनच्या नातलगाच्या लग्नात मंत्री, आजी-माजी आमदार, खासदारांची उपस्थिती

नाशिक, दि. २४ - नाशिकचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातलगाच्या लग्नाचीदावतखाणारे सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सोमनाथ तांबे यांच्यासह इतर काही पोलिस अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली असून या पोलिसांची आयबी या गुप्तचर संस्थेकडूनही चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आठ दिवसांपूर्वी दाऊदचे नातलग असलेल्या नाशकातील बड्या असामीच्या पुतणीच्या झालेल्या लग्न सोहळ्यास पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह तीन स्थानिक आमदार, महापौर, उपमहापौर यांच्यासह आजी-माजी आमदार, खासदारांनी हजेरी लावली. यात सहायक आयुक्त सचिन गोरे, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, सोमनाथ तांबे, संजय देशमुख, समशेरखान पठाण, मनोज शिंदे, हनुमंत वारे, कांतीलाल चव्हाण, विनोद केदार आणि विजय लोंढे आदींचा समावेश आहे. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्यासह अंडरवर्ल्डमधील काही बडे लोकही या सोहळ्यात उपस्थित असल्याचा संशय आहे.

या शाही सोहळ्याचे चित्रीकरण उपलब्ध झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर काही पोलिसांनीच पसरवल्यानंतर प्रकरण उघडकीस आल्याचे सांगण्यात येते. शहर खतीब यांच्याकडून अधिकाऱ्यांना निमंत्रण पत्रिका देण्यात आली असल्याची माहिती आहे. जे अधिकारी, कर्मचारी या सोहळ्यास गेले त्यांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली.