ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अखेर ९ ऑगस्टला धडकणार मराठा क्रांती मोर्चाचे वादळ

मुंबई, दि. २४ - मराठा क्रांती मोर्चाची तारीख अखेर ठरली असून मुंबईत येत्या ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाचे वादळ मुंबईत धडकणार आहे. आज मुंबईतील सम्राट हॉटेलमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

हा महामोर्चा सर्व आचारसंहितांचे पालन करून काढला जाईल. पहिला मोर्चा ऑगस्टला क्रांतिदिनी निघाला होता. म्हणून ऑगस्टला मुंबईतील महामोर्चा काढणार असल्याचे समन्वयकांनी सांगितले. जूनला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनाचे निमित्त साधत या मोर्चासाठी वातावरणनिर्मिती व्हावी यासाठी गावोगावी महामोर्चाची माहिती देण्यासाठी व्यापक अभियान सुरू केले जाणार आहे. तर १३ जुलैला कोपर्डी येथील क्रांती ज्योतीला श्रद्धांजलि वाहून अभियानाचा आढावा घेतला जाईल. सरकारसोबत चर्चा करण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे. ही समिती यापुढे सर्व प्रश्नांवर सरकारसोबत चर्चा करेल. शेतकरी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर यंदाच्या हंगामात शैक्षणिक वर्षात ठोस निर्णय येत्या दिवसांत जाहीर करण्यात यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.