ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सुप्रिया सुळेंचे शिवसेनेला आव्हान, हिंमत असल्यास सत्तेतून बाहेर पडा

परभणी, दि. २४ - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कर्जमाफीच्या मुद्यावर दोन दगडावर पाय ठेवून सुखसोयींसाठी मंत्रिपद भोगणाऱ्या शिवसेनेने हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडावे, असे खुले आव्हान येथे केले आहे. सध्याच्या सरकारचे कान बंद असून झोपेचे सोंग घेणारे हे सरकार अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची वाट पाहणार आहेत, असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.

बुधवारी येथील राष्ट्रवादी भवनात खासदार सुळे यांच्या हस्ते यशस्विनी अभियान यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण यांच्या वतीने जिल्ह्यातील २५ विधवा महिलांना रोजगार साहित्याचे वाटप करण्यात आले.त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, राज्यात शेतकरी संकटात आहे, दिवसेंदिवस आत्महत्यांचे आकडे वाढत चालले असताना झोपेचे सोंग हे सरकार घेत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. जुमले पे जुमला असे हे सरकार असून कान बंद करुन केवळ बोलघेवडेपणा सुरू केला आहे.

शेतकऱ्यांचे कंबरडे मोडायचे असे या सरकारचे ध्येय असल्याची, टीका सुळे यांनी केली. या सरकारला एवढ्या आत्महत्या होत असताना त्याचे काहीच वाटत नसल्याने अजून किती शेतकऱ्यांचे बळी घेणार असा प्रश्न त्यांनी यावेळी केला.