ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

तेजस एक्स्प्रेसच्या पहिल्याच फेरीत प्रवाशांचा हेडफोन्सवर डल्ला

मुंबई, दि. २५ - मुंबई आणि गोव्याला जोडणाऱ्या सुपरफास्ट, हायटेक तेजस एक्स्प्रेसवर प्रवाशांनीच डल्ला मारला आहे. प्रवाशांनी चक्क हेडफोन्स चोरुन नेल्याचा प्रकार पहिल्याच फेरीनंतर समोर आला आहे. त्यामुळे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही चक्रावून गेले आहेत. तेजस एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी प्रवासात वापरण्यासाठी दिलेले हेडफोन्स परत करण्याचीही तसदी घेतली नाही. त्याचप्रमाणे दोन एलईडी स्क्रीन्सचंही नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे. बुधवारच्या प्रवासात अनेक प्रवाशांनी हेडफोन्स मिळाल्याची तक्रार केल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.

सोमवारी झालेल्या पहिल्या फेरीतच इतकं चौर्यकर्म होत असेल, तर यापुढे किती जणहात साफकरतील, असा प्रश्न रेल्वे अधिकाऱ्यांना पडला आहे. मुंबई-गोवा हे ५५२ किमीचं अंतर आठ ते नऊ तासात पार करणारी तेजस एक्स्प्रेस जमिनीवरीलविमान प्रवासअशी ऐट मिरवणार आहे. मात्र त्यापूर्वीच तिला चोरट्यांचं ग्रहण लागलं आहे.

सीट्सला जोडलेले एलईडी स्क्रीन्स, वायफाय, सीसीटीव्ही कॅमेरा, टी-कॉफी व्हेंडिंग मशिन अशा अनेक सोयीसुविधा तेजसमध्ये आहेत. ट्रेनमधील किमान डझनभर हेडफोन्स गायब झाले आहेत. हेडफोन परत करण्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नव्हती. ज्याप्रमाणे ट्रेनमधील उशा-चादरी कोणी घरी नेत नाही, तसं हे हेडफोन्स प्रवासी ते परत करतील, अशी किमान अपेक्षा होती, असं एका रेल्वे अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

एका हेडफोनची किंमत रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेली नसली, तरी ते फारसे महाग नसल्याचं सांगण्यात आलं. मात्र रेल्वेच्या झालेल्या नुकसानापेक्षा प्रवाशांची मानसिकता चक्रावून टाकणारी आहे, असं अधिकाऱ्यांना वाटतं. ९९२ सीट्स असलेल्या तेजसचं सर्वात स्वस्त तिकीट एक हजार १८५ रुपये (चेअर कार, फूड शिवाय) आहे. तर एक्झिक्युटिव्ह क्लासचं सर्वात महाग तिकीट हजार ७४० रुपये आहे.

अत्याधुनिक सेवेनं सज्ज असलेल्या तेजस एक्स्प्रेसनं परतीच्या प्रवासातही प्रवाशांची घोर निराशा केली होती. मुंबई सीएसटीहून गोव्याकडे करमालीला थाटामाटात गेलेली तेजस एक्सप्रेस येताना मात्र दृष्ट लागल्यासारखी आली. परतीच्या प्रवासात ट्रेनमध्ये अस्वच्छता, दुर्गंधी आणि अपुऱ्या सोयींमुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जेव्हा तेजस करमाळी स्थानकावरून निघालीतेव्हा ट्रेनमध्ये स्वच्छता नव्हती. तसंच ट्रेनमधील टॉयलेट्स साफ केल्यानं सर्वत्र दुर्गंधी पसरली असं प्रवाशांचं म्हणणं आहे. दुसरी