ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बारावीचा निकाल मे अखेर, तर दहावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात

मुंबई, दि. २६ - पालकांसह विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता लागली असून अनेक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण यात काहीही तथ्य नाही. दहावीचा निकाल जून पूर्वी तर बारावीचा निकाल २९ मे आधी लागण्याची शक्यता आहे.

पालक आणि विद्यार्थी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या दहावी, बारावीच्या निकालांच्या तारखांमुळे संभ्रमात होते. पण आता लवकरच बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. बोर्डाकडून बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. निकालाची तयारी सुरू आहे. विभागीय मंडळांची कामे पूर्ण झाल्याने निकालाला थोडा उशीर होत आहे.

निकालाची तयारी अंतिम टप्प्यात असून मे अखेरपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र अद्याप बोर्डाने निकालाची तारीख जाहीर केलेली नाही. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही मंडेळातर्फे करण्यात आले आहे.