ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

हत्येचा कट रचल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाला अटक

नाशिक, दि. २७ - नाशिकमधील भाजपचे नगरसेवक हेमंत शेट्टी यांना काल (शुक्रवार) रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली आहे. हत्येचा कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी हेमंत शेट्टी यांना बेड्या ठोकल्या आहेत. जालिंदर उगलमुगले या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यांनी दिलेल्या जवाबानुसार हेमंत शेट्टी यांना पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. अखेर चौकशीअंती पोलिसांनी त्यांना अटक केली. तब्बल २० महिन्यानंतर या प्रकरणाचा छडा लावण्यात नाशिक पोलिसांना यश आलं आहे.

जालिंदर उगलमुगले हा ऑक्टोबर २०१५ पासून बेपत्ता होता. जालिंदर बेपत्ता असल्याची त्याच्या कुटुंबीयांनी तक्रारही केली होती. त्यानंतर जालिंदरसोबत घातपात झाली असल्याची भीती कुटुंबीयांनी व्यक्त केली होती. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपासाची चक्र वेगानं फिरवली.